Babri Masjid And Politics : इतक्या वर्षांनी बाबरीचा विषय का? बाबरी, बीळ आणि उंदीर
अयोध्येत राममंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे...त्याचे खांब उभे राहून आता कळसाकडे वेगानं वाटचाल सुरू आहे.. मात्र राममंदिराच्या भोवतीचं राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाही... यावेळी मुद्दा उकरून काढण्यात आलाय बाबरीचा.. आणि खोदकाम केलयं.. भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी... बाबरी मशिदीविषयी भाष्य करताना चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेबांचं नाव घेतलं आणि वादाला सुरुवात झाली.. साहजिकच संजय राऊतांनी पहिली टीकेची झोड उठवली आणि त्यानंतर शिंदे आणि ठाकरेंच्या कंपूमध्ये ठिणगी पडली.. आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांनीही त्यात उडी घेतली.. उद्धव ठाकरेंनी तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या अन्यथा राजीनामा द्या असं आव्हानच त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिलंय.. आता बाळासाहेबांचं नाव आल्यामुळे स्वतः एकनाथ शिंदेंनी चंद्रकांत पाटलांशी फोनवरून संवाद साधत स्पष्टीकरण देण्याची विनंती केली आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांनी आपण बाळासाहेबांचा कधीच अनादर करू शकत नाही असं म्हणत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला..