एक्स्प्लोर
Parbhani Tree : रस्त्यालगतच्या महाकाय वृक्षांची तोड , अनेक महाकाय वृक्षांचे केले पुनर्रोपण
राज्यात अनेक महामार्गांच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि त्यासाठी रस्त्यालगतच्या महाकाय वृक्षांची तोड केली जाते. दुर्दैवाने या वृक्षांचं पुनर्रोपण केलं जात नाही. असं असलं तरी अशा वृक्षांचं पुनर्रोपण करण्याची मोहीम सह्याद्री देवराईने सुरू केलीय. आज रणरणत्या उन्हात परभणीच्या परळी-गंगाखेड महामार्गावरील अनेक मोठ्या वृक्षांचं पुनर्रोपण करण्याचं काम अभिनेते सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराईने केलंय. या निमित्ताने सरकारची वृक्ष लागवड योजना केवळ कागदावर असल्याचा आरोप सयाजी शिंदे यांनी केलाय...
आणखी पाहा























