एक्स्प्लोर

Iran Israel War : तीनच आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प जेरीस, अमेरिकेवरील कर्जाचा बोजा वाढला, दबावही वाढला

USA Debt : चार दिवसात युद्ध संपवू अशी फुशारकी मारणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दबाव आता वाढला आहे. हे युद्ध जर लांबलं तर त्याचा मोठा आर्थिक फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे.

Iran Israel Conflict : इराण युद्ध सुरू होऊन जेमतेम तीन आठवडेही होत नाहीत तोवरच अमेरिकेवरील आर्थिक दबाव वाढत चालल्याचं दिसून येतंय. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेचं कर्ज झपाट्याने वाढतंय. अमेरिकेवरचं एकूण कर्ज 39 ट्रिलियनडॉलर्सपेत्रा जास्त असल्याची माहिती आहे. फक्त दोन महिन्यांपूर्वी हे कर्ज सुमारे 37 ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास होतं. आता युद्ध सुरू झाल्यानंतर त्यामध्ये मोठी भर पडल्याचं दिसतंय.

काही तज्ञांच्या मते, अमेरिकेवरील कर्जाचा हा आकडा लवकरच 40 ट्रिलियन डॉलर्सच्या दिशेने जाऊ शकतो. मात्र या कर्जसंकटात अमेरिकेचा संरक्षण विभाग पेटांगनकडून एक मोठी मागणी समोर आली आहे. पेंटागनने अमेरिकन संसदेपुढे युद्धसज्जता आणि शस्त्रनिर्मितीसाठी सुमारे 200 अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेची संसद नेमकी काय निर्णय घेते हे पाहावं लागेल.

Iran Israel War Update : आखाती देशांची महत्त्वाची बैठक

इराणनं कतारच्या रास लफान या सर्वात मोठ्या साठ्यांपैकी एक असलेल्या ऊर्जा साठ्यावर हल्ला केल्यानंतर आखाती देशांनी तातडीनं बैठक घेतली आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये तातडीची बैठक पार पडली. त्यामध्ये कतार, अझरबैजान, बहारीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, तुर्कीए आणि यूएईसह अनेक देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात इराणला तात्काळ हल्ले थांबवण्याचं आवाहन करण्यात आलं. या बैठकीत इराणच्या कारवाईचा निषेध करत हे हल्ले संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेसाठी गंभीर धोका निर्माण करत असल्याचं मत या देशांच्या प्रतिनिधींनी मांडलं. 

US On War : गॅस तळांवर हल्ला न करण्याच्या सूचना

कतार आणि इराणमधील हल्ल्यामुळे अमेरिकेवर दबाव वाढल्याचं चित्र आहे. ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांमुळे अमेरिका बचावात्मक भूमिकेत गेल्याचं दिसतंय. इराणमधील हल्ल्यानंतर अमेरिकनं इस्त्रायलला गॅस तळांवर हल्ला टाळण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आहे. त्याचवेळी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनमधल्या सैन्य तळाजवळ ड्रोन दिसल्यानं खळबळ उडाली आहे. यानंतर व्हाईट हाऊसमध्ये तातडीची बैठक घेण्यात आली. अमेरिकेच्या भूमीपर्यंत पलटवार करण्याची इराणची तयारी असल्याचा संशय असल्यानं अमेरिका अलर्ट मोडवर गेल्याची माहिती आहे. 

UN Appeal To Iran Israel : संयुक्त राष्ट्रांकडून युद्ध थांबवण्याचं आवाहन

आखाती देश इराणला हल्ले थांबवण्याचं आवाहन करत असताना आता संयुक्त राष्ट्र संघाकडूनही आवाहन करण्यात आलं आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराणनं तात्काळ युद्ध थांबवावं, असं आवाहन संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आलं आहे. लेबनॉनवर इस्रायलने हल्ला केला होता. त्यामुळे 10 लाखांपेक्षा जास्त लोक बेघर झाले आहेत. या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघाने चिंता व्यक्त केली आहे. तसंच युद्ध थांबवावं असं आवाहनही केलं.

दरम्यान, आखातात सुरु असलेल्या युद्धाबाबत स्पेननं अतिशय ठाम भूमिका घेतली आहे. स्पेननं युद्धाला विरोध दर्शवला असून युरोपीयन युनियननं युद्धाबाबत स्पष्ट भूमिका घ्यावी अशी मागणी केली. ऊर्जा दरवाढीमुळे युरोपीयन नागरिकांवर परिणाम होत असल्याचं स्पेनचं म्हणणं आहे. हा संघर्ष युरोपचा नसून याबाबत युरोपला योग्य माहितीही देण्यात आलेली नाही अशी भूमिका स्पेननं मांडली आहे. 

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
US vs Iran : ट्वीट करुन होर्मुझवर ताबा मिळणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणचा पलटवार
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget