एक्स्प्लोर

अमेरिकेची नवीन चिंता! पाकिस्तान बनतोय ‘नवा धोका’? गुप्तचर अहवालाने वाढवलं महासत्तेचं टेन्शन

US Report On Pakistan : अमेरिकेच्या गुप्तचर अहवालात पाकिस्तानचा नव्या संभाव्य धोक्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. ICBM क्षमतेमुळे पाकिस्तान हा अमेरिका, भारतासाठी धोका बनण्याची शक्यता आहे.

मुंबई : अमेरिकेचे शत्रू म्हटलं की चीन, रशिया, इराण आणि उत्तर कोरिया ही नावं नेहमीच पुढे येतात. मात्र आता या यादीत आणखी एका देशाची भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तो म्हणजे पाकिस्तान. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या नव्या अहवालामुळे ही चर्चा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. आतापर्यंत अमेरिकेचा मित्रदेश मानला जाणारा पाकिस्तानच भविष्यात धोका ठरू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे जागतिक पातळीवर सुरक्षेचे समीकरण बदलण्याची चिन्हं दिसत आहेत.

US Intelligence Report : पाकिस्तानकडून वाढता क्षेपणास्त्र धोका

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी सिनेटसमोर दिलेल्या साक्षीत महत्त्वाची माहिती उघड केली. त्यांच्या मते, रशिया, चीन, उत्तर कोरिया, इराण आणि पाकिस्तान हे देश अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांवर संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्रांच्या मारक क्षमतेत अमेरिका देखील येतो.

याशिवाय, सध्या अमेरिकेला 3,000 पेक्षा अधिक क्षेपणास्त्रांचा धोका आहे. 2035 पर्यंत हा आकडा 16,000 पेक्षा जास्त होऊ शकतो, असंही म्हटलं आहे.  

ICBM Technology : आंतरखंडीय क्षेपणास्त्र किती धोकादायक?

ICBM म्हणजेच Intercontinental Ballistic Missile ही अत्यंत प्रगत आणि विध्वंसक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. यांचा पल्ला किमान 5,500 किमी असतो. काही आधुनिक ICBM 10,000 ते 15,000 किमीपर्यंत पोहोचू शकतात. पृथ्वीच्या वातावरणाबाहेर जाऊन पुन्हा लक्ष्यावर अचूक प्रहार करतात. त्याचा वेग ध्वनीपेक्षा अनेक पटींनी जास्त असतो. MIRV तंत्रज्ञानामुळे एकाच क्षेपणास्त्रातून अनेक अण्वस्त्रे वेगवेगळ्या लक्ष्यांवर सोडता येतात, ज्यामुळे त्यांची विध्वंसक क्षमता अनेकपटींनी वाढते.

Pakistan Missile Program : पाकिस्तानचं गुप्त क्षेपणास्त्र मिशन

सध्या पाकिस्तानकडे अधिकृतपणे ICBM नसल्याचं मानलं जात असलं तरी, ‘तैमूर’ नावाच्या प्रकल्पावर काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 

संभाव्य रेंज: सुमारे 7,000 किमी

MIRV तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता

‘अबाबील’ आणि ‘शाहीन-3’ सारखी प्रगत क्षेपणास्त्रे आधीच ताफ्यात

यामुळे पाकिस्तान भविष्यात लांब पल्ल्याच्या अणुहल्ल्यास सक्षम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते.

India Defence Power : भारताचं ब्रह्मास्त्र ‘अग्नी-5’

भारताकडे DRDO ने विकसित केलेलं अग्नी-5 हे अत्याधुनिक ICBM आहे.

रेंज: 5,500 ते 5,800 किमी

अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता: सुमारे 1,500 किलो

रस्ता आणि रेल्वेमार्गाने वाहतूक शक्य

उच्च अचूकता आणि विश्वसनीयता

भारताच्या संरक्षण क्षमतेत यामुळे मोठी भर पडली आहे.

Global Security : जगासाठी वाढती धोक्याची घंटा

अमेरिकेच्या गुप्तचर अहवालानुसार, जर पाकिस्तानने ICBM तंत्रज्ञानात यश मिळवलं, तर केवळ अमेरिका नव्हे तर भारत आणि इतर देशांसाठीही ही गंभीर बाब ठरू शकते. अण्वस्त्रसज्जता ही स्वसंरक्षणासाठी आवश्यक असली तरी, त्याचा आक्रमक वापर जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका ठरू शकतो.

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
अमेरिकेचा इराणवर मोठ्या हल्ल्याचा 'मास्टरप्लॅन'? डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्याला दिले महत्त्वाचे आदेश, म्हणाले, 'एक वेळ अशी येईल की...'
Pakistan News: पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
पाकिस्तानात मोठी दुर्घटना! कोळसा खाणीत भीषण स्फोट झाला अन् होत्याचं नव्हतं झालं; 32 कामगारांचा मृत्यू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Nepal Violence: कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी
कावड यात्रेदरम्यान डीजेवरून वाद पेटला अन् नेपाळमध्ये जातीय तणावाचा भडका; पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा जीव गेला, अनेक जिल्ह्यात संचारबंदी

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
Embed widget