Nashik : ईगतपुरीतील जिंदाल कंपनी अग्नितांडव प्रकरणी 50 दिवसांनंतर गुन्हा दाखल
नाशिकच्या ईगतपुरी तालुक्यातील बहुचर्चित जिंदाल कंपनी अग्नीतांडव प्रकरणी ५० दिवसानंतर घोटी पोलीस ठाण्यात कंपनी प्रशासनाच्या सात जणांविरोधात पोलिस अधिकाऱ्यानेच दिलेल्या तक्रारीनूसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीचे भोगवटादार, फैक्टरी मॅनेजर, पॉली फिल्म प्लॅन्ट बिजनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेन्सस विभाग प्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लॅन्ट ऑपरेटर या सात जणांवर सुरक्षेची योग्य काळजी न घेणे, निष्काळजीपणा केल्याने तिन कामगारांचा मृत्यू तसेच 22 जण जखमी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. या घटनेच्या चौकशीच्या अनुषंगाने औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबंधित विभागांना पत्रव्यवहार करुन अहवाल मागविण्यात आले होते.























