एक्स्प्लोर
Lockdown 4.0 | नाशिकमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सचं पथसंचलन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्सची एक तुकडी तैनात करण्यात आली असून नाशिक पोलिसांवरील कामाचा ताण कमी होण्यास यामुळे नक्कीच मदत होणार आहे. या तुकडीमध्ये ३ अधिकाऱ्यांसह १३० जवानांचा समावेश आहे. शहरातील विविध भागात नाशिक पोलिसांसोबत या तुकडीकडून पथसंचलन केलं जातय. भद्रकाली परिसरात रॅपिड ऍक्शन फोर्ससह २५ पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून संचलन केल गेलं, संचलनाच्या मार्गावर अनेक ठिकाणी पोलिसांवर फुलांचा वर्षाव करण्यासोबतच टाळ्या वाजवून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.. दरम्यान या संचलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















