Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार
Kishor Darade Nashik : किशोर दराडे नाशिक शिक्षक विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teachers Constituency) निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) विजयी झाले आहेत. गेल्या 24 तासांपासून मतमोजणी सुरू होती. पहिल्या पसंतीच्या विजयाचा कोटा पूर्ण झाल्यानंतर आज सकाळपासून दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झालेली. पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत किशोर दराडे आघाडीवर होते. तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे आणि किशोर दराडे यांच्यात रस्सीखेच सुरू असल्याचं दिसत होतं. पण, अखेर किशोर दराडेंनी विजय मिळवला. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची झाली होती. तब्बल 24 तासांपासून या निवडणुकीची मतमोजणी सुरू होती. अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना विजयी घोषित करण्यात आलं. नाशिक मतदारसंघात ही निवडणूक अनेक अर्थांनी गाजली होती. पैशांच्या वाटपाच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे ही निवडणूक गाजली होती. तसेच, स्वतः मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष घातलं होतं. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या पक्षानं देखील उमेदवार दिला होता. तसेच, अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचं सर्वात मोठं आव्हान किशोर दराडेंसमोर होतं. आतापर्यंत किशोर दराडे आणि विवेक कोल्हे यांच्यात चुरस रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. पण अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाचे किशोर दराडे यांनी बाजी मारली असून विजयी झाले आहेत.