एक्स्प्लोर
Nanded Parents vs Teacher : शाळेत मुलाला मारलं म्हणून पालकाकडून शिक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल
शाळेत मुलाला मारलं म्हणून पालकानं चक्क शिक्षकालाच बेदम मारहाण केली आहे. नांदेड जिल्ह्यातल्या माळाकोळी जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये ही घटना घडली. पालकाच्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिक्षक किशोर विधाते हे 24 नोव्हेंबरला शाळेत शिकवत असताना मधुकर राठोड हे पालक वर्गात येऊन धडकले. माझ्या मुलाला मारहाण का केली, असा जाब विचारत त्यांनी शिक्षकाला मारायला सुरुवात केली.
आणखी पाहा























