एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Maharashtra Update : भारत जोडो यात्रा काही क्षणात नांदेडच्या देगलूरमध्ये
कन्याकुमारी हुन निघालेली राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अवघ्या काही तासातच तेलंगणा ,कर्नाटक राज्याचे शेवटचे टोक व महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या मदनूर या गावात पोहचणार आहे. तेलंगणा व महराष्ट्राला जोडणाऱ्या 161 राष्ट्रीय महामार्गा वरून महाराष्ट्राकडे मार्गक्रमण करेल. दरम्यान या महामार्गावर राहुल गांधी याचे मोठ्या प्रमाणात बॅनर,फ्लेक्स ,कमानी आणि झेंडे लावून स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलीय.मोठ्या प्रमाणात तीन राज्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते या सीमेवरून राहुल गांधी यांना घेण्यासाठी आता दाखल होतील. आणि ही यात्रा महाराष्ट्रात मार्गक्रमण करेल.
आणखी पाहा























