(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur Floods : नागपूरमध्ये पुराचं थैमान, संकट नैसर्गिक की मानवनिर्मित?
Nagpur Floods : नागपूरमध्ये पुराचं थैमान, संकट नैसर्गिक की मानवनिर्मित?
नागपूर मध्ये नागनदीवर शासकीय यंत्रणेने केलेले बेजबाबदार बांधकाम हेच महापूर व त्यातून नागरिकांच्या झालेल्या नुकसानाला जबाबदार असल्याचे एबीपी माझाच्या रियालिटी चेक मध्ये दिसून आले. *झाशी राणी चौकात नागनदीवरचा पूल जो महापुरात वाहून गेला. त्याला प्रमुख कारण ठरले त्या पुलावर बांधलेले नागपूर महानगर पालिकेचे शहर बससेवेचे बस स्थानक.... पुराच्या प्रववाहाला बस स्थानक अडथडा बनल्याने प्रवाहाने बस स्थानकाला उखडून फेकले. त्यामुळे त्या बस स्थानकासोबत पुलाचा एक भाग कोसळला.. त्यामुळे शासकीय यंत्रणेच्या चुकीच्या बांधकामाने पुराचे पाणी नाग नदीच्या पात्राच्या बाहेर फेकण्यास व नासधूस करण्यात हातभार लावला.* नागपूर महानगर पालिकेच्या भोंगळ कारभाराचा रियालिटी चेक केला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.