Devendra Fadanvis : नागपुरातील पूरस्थिती टाळण्यासाठी विशेष उपाययोजना ; फडणवीसांची सखोल माहिती
नागपूरातील अंबाझरी ओव्हर फ्लो पॉईंट जवळच्या दुरुस्ती कामाची आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली.. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणातून अंबाझरी तलावाचा पाणी नागपूर शहरात शिरला होता.. आणि नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली होती... तेव्हापासून अंबाझरी तलावाचे मजबुतीकरण करण्यात यावे, तसेच अंबाझरी तलावाच्या ओव्हरफ्लो पॉईंट जवळ पाण्याचा मोठा प्रवाह सामावून घेण्यासाठी आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी होत होती... त्यानंतर राज्य सरकारचा जल संसाधन विभाग, नागपूर महानगरपालिका आणि इतर विभागांनी समन्वयातून दुरुस्तीचे काम सुरू केले होते... त्याचीच पाहणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली....
मागील वर्षी पूर आल्यानंतर विविध विभागांचा समन्वय आपण घडवून आणला होता.. आणि पुराची कारणे काय आहेत, कुठे प्रवाहात अडथळे याचा विचार करण्यात आला होता...
दीर्घकालीन आणि त्वरित करावयाची अशी दोन प्रकारची कामे घेतली आहे... काही दीर्घकालीन कामामध्ये सांडवा मजबुतीकरण केला जात आहे.. पंधरा दिवसात पूर्ण होईल.. पाण्याची पातळी मेंटेन करण्यासाठी उपाय केले आहे.. त्यासाठी सांडव्याच्या भिंतीमध्ये तीन दार लावले जातील.. तोवर पाणी निघण्यासाठी वेगळा मार्ग देण्यात येणार आहे...
मागील वर्षी आलेल्या पुराच्या वेळेला दोन अडथळे प्रमुख होते... त्यामध्ये रस्त्यावरील पुलाची उंची कमी होती ती उंची वाढवली जात आहे... दहा जून पर्यंत त्याचा काही काम होईल...
समोरच्या वस्त्यांमध्ये स्केटिंग रिंग आणि पार्किंग मुळे काही ठिकाणी प्रवाहात अडथळे आले होते तेही काढले जाणार...
अंबाझरी तलावाच्या काठावर असलेला विवेकानंदांचा स्मारक हटवण्या संदर्भात तज्ञांची समिती स्थापन केली आहे... ती समिती जे निर्णय घेईल त्याप्रमाणे अंतिम निर्णय केला जाईल..
तज्ञांची समिती जे जे सुचवेल त्याप्रमाणे कारवाई केली जाईल....