Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करत आहे!!
महायुतीत भाजपसोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्री विदर्भात भाजप पेक्षा महाविकास आघाडी सरकार असतानाच्या वेळेच्या तत्कालीन सहकारी मंत्र्यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप विदर्भातील भाजप नेत्यांनी केला आहे.. महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील हे दोन मंत्री विदर्भात भाजप नेत्यांऐवजी महाविकास आघाडीतील माजी मंत्रांना साथ देतात, असा अत्यंत गंभीर आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे...
नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सहकार कायद्यानुसार आरोपी सुनील केदार आणि इतर दोषी संचालकांकडून प्रस्तावित वसुलीच्या प्रकरणात दिलीप वळसे पाटील वारंवार सुनावणी टाळून सुनील केदार यांना साथ देत असल्याचा गंभीर आरोप आशिष देशमुख यांनी केलाच आहे...
सोबतच कृषी मंत्री धनंजय मुंडे अनिल देशमुखांच्या सांगण्यावरून निर्णय करत असल्याचा आरोपही आशिष देशमुख यांनी केला आहे... 12 सप्टेंबर रोजी विदर्भातील संत्रा व मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रालयात एक विशेष बैठक बोलावण्यात आली होती.. मात्र अनिल देशमुख यांच्या दबावाखाली धनंजय मुंडे यांनी ती बैठक अचानक रद्द केली.. त्यामुळे कृषी मंत्री असूनही धनंजय मुंडे यांना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नाही, उलट ते आपले पूर्वीचे सहकारी अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप आशिष देशमुख यांनी केला...