Aaditya Thackeray on Disha Salian Case : 32 वर्षाच्या तरुणाला सरकार घाबरलं, सरकारवर घणाघात
Aaditya Thackeray in Nagpur Winter Session : "एका 32 वर्षाच्या तरुणाने खोके सरकारला हलवून ठेवलं आहे, त्यामुळे बदनामीचे प्रयत्न सुरु आहेत," अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी दिली आहे. नागपूरमधील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि रिया चक्रवर्तीच्या फोन कॉलमधील AU नावावरुन हिवाळी अधिवेशनात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सभागृहात केली. त्यानंतर आदित्य ठाकरे नागपुरात माध्यमांशी बोलत होते.























