एक्स्प्लोर

Urmila Matondkar : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार!

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. उर्मिला मातोंडकर उद्या (1 डिसेंबर)  दुपारी बारा वाजता त्या शिवसेनेत सामील होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्या आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे विधानपरिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 सदस्यांमध्ये शिवसेनेने आपल्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांना आधीच उमेदवारी दिली आहे.

उर्मिला मातोंडकर हे नाव सिनेसृष्टीसह अखिल भारताला कळलं ते 1983 मध्ये. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला यांनी मासूम या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं. हिंदी इंडस्ट्रीत नायिका म्हणून त्यांनी शिरकाव केला तो 1991 मध्ये नरसिंहा या चित्रपटातून. त्यानंतर रंगीला, सत्या, कौन, जंगल, मस्त, जुदाई, प्यार तुने क्या किया अशा अनेक चित्रपटांतून विविध भूमिका साकारून उर्मिला यांनी चतुरस्र अभिनेत्री अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांच्या अभिनय कौशल्याबद्दल त्यांना फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

कालांतराने उर्मिला आपल्या वैवाहिक जीवनात व्यग्र झाल्या. पण मार्च 2019 मध्ये त्या पुन्हा चर्चेत आल्या. त्याला कारणही तसं होतं. उर्मिला मातोंडकर यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉंग्रेस पक्षाने त्यांना उत्तर मुंबई मतदारसंघातून खासदारकीचं तिकीट देऊन रिंगणात उतरवलं. ती निवडणूक त्या हरल्या पण त्यांना मिळालेली मतं पाहता आपल्या विचारी आणि विवेकी संवाद कौशल्यातून त्यांनी चांगली लढत दिली. या निवडणुकीनंतर पक्षांतर्गत झालेल्या राजकारणाला कंटाळून त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. उर्मिला यांनी अलिकडच्या काळात कंगना रनौतवरही आपल्या चिंतनशील आणि अभ्यासू वृत्तीने पलटवार केला. त्यानंतर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली. आता त्या अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

बातम्या व्हिडीओ

Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन

धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास

मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

MVA Seat Sharing : मविआच्या बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यताRamdas Kadam on MVA Seat Sharing : काहीच तासात मविआ तुटणार! रामदास कदमांचा मोठा दावाABP Majha Headlines : 06 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRajkumar Badole Join NCP : भाजपचा बडा नेता ; विदर्भात अजित पवारांची ताकद वाढली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी; नागरिकांना पाणी गाळून व उकळून पिण्‍याचे BMC चे आवाहन
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
धक्कादायक खुलासा... बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपींनी अगोदर झाडाव गोळ्या चालवून केला सराव, लोकलने प्रवास
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
मुंबईत शिवसेनाच मोठा भाऊ, महाविकास आघाडीतील वाद निवळला; 105-95-80 जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
नेत्यांकडून विकासाच्या बाता, पण विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; चक्क जेसीबीतून पूर ओलांडला
मी तुतारीची वाट बघतोय! रमेश थोरातांचा अजित पवारांना मोठा धक्का, शरद पवार गटात करणार प्रवेश 

वकिलानं उभारलं न्यायालय, स्वत:च बनला न्यायाधीश, निकालही दिला; गुजरातमधील धक्कादायक घटना

मोठी बातमी : अजित पवारांनी पहिल्या आमदाराचं तिकीट कापलं? पिंपरीतील आमदाराच्या जागी नवा चेहरा देण्याची चिन्हं!

राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी... अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांविरुद्ध उतरवला उमेदवार, टाकला राजकीय डाव

Embed widget