Seatbelt : चारकचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस
मुंबईत चारचाकी वाहनांमध्ये सीटबेल्ट लावण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे.. उद्यापासून चारचाकी वाहनातून प्रवास करणारे चालक आणि मागील सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आलाय.. ज्या वाहनांमध्ये मागील सीटवर सीटबेल्टची व्यवस्था नाही अशा वाहनांना सीटबेल्ट बसवता यावा यासाठी मुंबई पोलिसांनी दिलेली १५ दिवसांची मुदत आज संपतेय... त्यामुळे तुमच्या कारमध्ये आजच सीटबेल्ट लावून घ्या.... मात्र अनेक कारचालकांनी अद्यापही सीटबेल्ट बसवलेले नाहीत. त्यामुळे उद्यापासून अशा चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे... पाठी बसलेल्या प्रवाशांनी सीटबेल्ट लावला नसल्यास चालकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येणार आहे.. त्यामुळे प्रवाशांचे पोलिसांसोबत खटके उडण्याची शक्यता आहे...मुंबईत टॅक्सीमेन्स युनियनने सीटबेल्टच्या निर्णयाला विरोध दर्शवलाय...























