Narayan Rane यांच्या मुंबईतील बंगल्याबाहेर कडेकोट सुरक्षा, नारायण राणे आज माध्यमांशी बोलणार?
नारायण राणेंना अटक करण्याचा निर्णय कुणी घेतला? हा प्रश्न गेल्या काही तासांपासून राज्यातील जनतेला पडलाय. राणेंना अटक करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला की सरकारकडून देण्यात आला.. याबाबतच एक नवी माहिती समोर येतेय... नारायण राणेंना अटक करण्याचा निर्णय सोमवारी रात्रीच झाला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला... अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय... यासंबंधित एक बैठक झाली होती आणि त्याच नारायण राणेंना अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला, अंतिम निर्णय देखील उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनीच दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.. मुख्यमंत्र्यांची जनतेतील प्रतिमा जपण्यासाठी आणि अशी वादग्रस्त विधानांवर कारवाई केली गेली पाहिजे म्हणून राणेंना अटक करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.. नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर आजही कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय.. कालच्या राड्यानंतर राणेंच्या घराबाहेर हा मोठा फौजफाटा तैनात आलाय..