एक्स्प्लोर
Thane Rain Red Alert | ठाण्यात मुसळधार पाऊस, पाणी साचले, लोकल सेवा विस्कळीत, रेड अलर्ट जारी
ठाणे जिल्ह्यात रात्रभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून मुसळधार सरी कोसळत आहेत. ठाण्यातील कापूर बावडी परिसर, ठाणे स्टेशन, मार्केट परिसर आणि वंदना डेपो या सखल भागांमध्ये पाणी साचले होते. इतर भागातील पाण्याचा निचरा झाला आहे. सकाळच्या वेळेला माजीवाडा सर्कल आणि घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी होती, मात्र आता वर्दळ कमी असल्याने वाहतूक सुरळीत सुरू आहे. लोकल सेवा अप आणि डाऊन मार्गावर वीस ते पंचवीस मिनिटे उशिराने धावत आहे. प्रशासनाने नागरिकांना 'गरज असेल तरच बाहेर पडा' अशा सूचना दिल्या आहेत. हवामान विभागाने पुढील तीन ते चार तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion

















