(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाट
Sanjay Shirsat Mumbai : 'आता शुभ बोलं रे नार्या' असं बोलण्याची वेळ आलेली आहे - संजय शिरसाट
आज मुंबईत शिवसेनेचे दोन दसरा मेळावे (Shiv Sena Dasara Melava 2024) पार पडणार आहेत. ठाकरे गटाचे दसरा मेळावा छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सायंकाळी 5 वाजता, तर शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर सायंकाळी 5 वाजता होणार आहे. शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, दसऱ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मेळावा होतो आणि मुंबईमध्ये हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेचा दसरा मेळावा होता. तो परंपरेनुसार आज होईल. आता दसऱ्याला मेळाव्यांची लाट आली आहे. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. पण शिवसेनेचाच म्हणाल तर तो शिवतीर्थावरचा मेळावा आहे. बाकी आता डुप्लिकेट लोक खूप येत आहेत. मेळावे करत आहेत. पण ज्या शिवसेनेची स्थापना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केली आणि प्रत्येक दसऱ्याला एक विचारांचं सोनं त्यांनी देशाला महाराष्ट्राला दिलं, ती माननीय उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवली आहे.