Sandeep Deshpande आणि Santosh Dhuri यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली ABP Majha
मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकललीय. न्यायाधीश उपस्थित नसल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. पुढील सुनावणी १७ मे रोजी होणार आहे. महिला पोलीस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी ४ मेचा अल्टिमेटम दिला होता. प्रतिबंधात्मक कारवाई दरम्यान पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन दोन्ही नेत्यांनी कारमधून पळ काढला. यावेळी एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली.





















