Raj Thackeray PC | दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं: राज ठाकरे
मुंबई : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्यांना प्रमोट करावं, निर्बंधांच्या काळातील वीज बिल माफ करा, शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशा अनेक सूचना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी सोमवारी (5 एप्रिल) मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांना केलेल्या सूचनांची माहिती दिली. राज ठाकरे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मिशन ब्रेक द चेन, अनिल देशमुख राजीनामा यासह विविध विषयांवर भाष्य केलं.
दरम्यान मुख्यमंत्र्यांनी या सूचनांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला असून. सूचना योग्य असून मंत्रिमंडळाशी चर्चा करुन उपाययोजना करु, असं त्यांनी म्हटलं, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.























