Anita Padhye : अनिता पाध्ये यांच्या पुस्तकांचं Raj Thackeray यांच्याकडून प्रकाशन
Anita Padhye : अनिता पाध्ये यांच्या पुस्तकांचं Raj Thackeray यांच्याकडून प्रकाशन
अनिता पाध्ये यांच्या प्यार जिंदगी है या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राज ठाकरे यांच्या हस्ते त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी संपन्न झाला. या पुस्तकात अनिता पाध्ये यांनी बारा लोकप्रिय हिंदी रोमँटिक चित्रपटांचा निर्मिती प्रवास उलगडला आहे. त्यामध्ये १९५५ मध्ये प्रदर्शित झालेल्या आणि बिमल रॉय दिग्दर्शित 'देवदास' पासून ते १९९९ साली प्रदर्शित झालेल्या आणि संजय लीला भन्साळी दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम या चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तक प्रकाशनाला एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्यासह लेखक मेहबूब, संगीतकार जतिन पंडित आणि शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
