(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल होणार
काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची मणिपूरमधून निघालेली भारत जोडो न्याय यात्रा तब्बल ६३ दिवस आणि सहा हजार ७०० किलोमीटरचा प्रवास करून आज दुपारी मुंबईत दाखल होणार आहे. ही यात्रा दुपारी दोन-तीनच्या सुमारास ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं रवाना होईल. ठाण्याहून एलबीएस मार्गानं मुलुंड भांडुप विक्रोळी आणि घाटकोपर करत ही यात्रा कुर्ला सायन परिसरात पोहोचेल. त्यानंतर धारावी नाईन्टी फिट रोडनं माहीममार्गे ही यात्रा दादरच्या दिशेनं निघेल. दादरला सेनाभवन येथून ती शिवाजी पार्क परिसरातून चैत्यभूमीवर दाखल होईल. राहुल गांधींच्या यात्रेचा चैत्यभूमी परिसरात संध्याकाळी सहाच्या सुमारास समारोप होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार, १७ मार्च रोजी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसह महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत.दरम्यान आज भिवंडीतील सभेत राहुल गांधी काय म्हणालेत.. पाहुयात.