Priya Berde on BJP : अंगप्रदर्शन करणाऱ्यांबद्दल भाजपला काही वाटत नाही आणि लावणी कलाकरांना बोलता?
अकोला : काल (सोमवारी 13 सप्टेंबर) विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. 16 सप्टेंबरला लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरीबांकडे पहाण्यासाठी वेळ नाही. रंगलेल्या गालाचे मुके घेणारा हा पक्ष आहे", असं वादग्रस्त वक्तव्य दरेकरांनी केलं होतं. काल पुणे जिल्ह्यातील शिरूर इथं क्रांतीकारक उमाजी नाईक जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याचा घणाघात दरेकर यांनी यावेळी केला होता.























