एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

NIA Raid At Pradeep Sharma house : आता प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार : किरीट सोमय्या

मुंबई : एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ताब्यात घेतलं असून आजच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. एनआयने मुंबईतील अंधेरी परिसरातील त्यांच्या घरावर छापे टाकले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून कारवाईला सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत. सीआरपीएफच्या आठ ते दहा कंपन्या इथे तैनात आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरण प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.

याआधी या प्रकरणात एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरण हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर फेब्रुवारी महिन्यात जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरण यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. काही महिने हे चौकशी थांबली होती. परंतु आज सकाळी एनआयएने त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांची चौकशी केली. 

"आधी शिवसेनेचे प्रवक्ते सचिन वाझे जेलमध्ये गेले आता शिवसेनेचे उपनेते आणि उमेदवार प्रदीप शर्मा जेलमध्ये जाणार आहेत. यानंतर अनिल परब यांच्यापर्यंत तपास यंत्रणा पोहोचल्यावर मला आश्चर्य वाटणार नाही. ही उद्धव ठाकरेंची गुंड सेना आहे, माफिया टोळी आहे. सगळेच जेलमध्ये जाणार आहेत. दापोलीतील रिसॉर्टमध्ये अनिल परब यांचा सदानंद कदम हा पार्टनर आहे. या सदानंद कदमचा पार्टनर असलेल्या कांदिवलीतील शिवसेना शाखाप्रमुखाने प्राडो गाडी मनसुख हिरणला मारण्यासाठी सचिन वाझे, प्रदीप शर्मा यांना दिली होती," अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

मुंबई व्हिडीओ

Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 29 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 07 AM : 29 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 Headlines  : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर : 06 AM : 29 NOV 2024Mahayuti Maharashtra New CM : दिल्लीत 2 तास बैठक, अमित शाहांशी चर्चा; महायुती काय ठरलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Soren : लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
लाडक्या बहिणींना 2500 रुपये मिळणार, 1 हजार रुपये वाढवले, हेमंत सोरेन यांनी शपथ घेताच पहिला निर्णय घेतला
Eknath Shinde Delhi Meeting: फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
फडणवीस-अजितदादांनी अमित शाहांसोबतचा फोटो सोशल मीडियावर लगेच टाकला, पण एकनाथ शिंदेंनी....
Eknath Shinde: काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच एकनाथ शिंदे म्हणाले, इतर पद...
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर चिंतेची काजळी दाटली; फोटोबाबत विचारताच शिंदे म्हणाले...
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
136 ग्रॅम चरस, 33 ग्रॅम एमडी अन् 11 लाखांची रोकड, मोठ्या अभिनेत्याच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक!
Amit Shah Meeting On Maharashtra CM: अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
अमित शाहांसोबतच्या बैठकीत एकनाथ शिंदे मनातलं सगळं बोलले; दिल्लीतील बैठकीची A टू Z कहाणी!
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
Embed widget