MVA Sabha Podium : मविआच्या सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळ्या पोडियमला अजित दादांचा विरोध?
MVA Sabha Podium : मविआच्या सभेत उद्धव ठाकरेंसाठी वेगळ्या पोडियमला अजित दादांचा विरोध?
महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत पोडियमवरून मतभेद झाल्याची चर्चा रंगलीय. नाना पटोले यांच्या भाषणावेळी उद्धव ठाकरेंच्या भाषणासाठी वेगळं पोडियम आणल्याचं बोललं जातंय. त्याचवेळी अजित पवार यांनी त्यास विरोध केल्याची कुजबुज रंगलीय. मात्र, आदित्य ठाकरेंनी समजूत घातल्यानंतर अजित पवारांनी वेगळ्या पोडियमला परवानगी दिल्याची चर्चा रंगलीय. महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या नेत्यांची भाषण वेगळ्या आणि अशोक चव्हाण, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांची भाषणं फुलांनी सजवलेल्या पोडियमवरून झाली. दरम्यान, छत्रपती संभाजी नगरच्या सभेवेळीही उद्धव ठाकरेंसाठी वेगळी खुर्ची ठेवण्यावरून मतभेद झाल्याची चर्चा रंगली होती, त्यानंतर सर्व नेत्यांना समान वागणूक देण्याचा निर्णय मविआच्या नेत्यांनी घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सभेत पोडियमवरून मतभेद झाल्याच्या खमंग चर्चांना उधाण आलंय.