MVA Protest Shivsena Bhavan Mumbai : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं शिवसेना भवन येथे आंदोलन
MVA Protest Shivsena Bhavan Mumbai : बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचं शिवसेना भवन येथे आंदोलन
बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर (Badlapur Minor Abuse Case) झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला आहे. महाराष्ट्रात तर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणामुळे विरोधकांनी सरकारवर सरकारवर सडकून टीका केली. दरम्यान, या घटनेनंतर महाविकास आघाडीकडून आज महाराष्ट्रभर निदर्शन करण्यात येत आहे. असे असतानाच आता बदलापूर घटनेची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. या समितीच्या प्राथमिक निष्कर्षानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार होते.
अहवालात नेमके काय?
1) त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.
2) गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता.
3) 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली.
4) त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्रा-शिवाय सहज प्रवेश होता.
5) त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे.
6) हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.
7) शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.
8) तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.
9) पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले.
एसआयटीने नोंदवले 17 जणांचे जबाब
बदलापूर प्रकरणात आतापर्यंत SIT ने 17 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यात शाळेच्या 10 शिक्षक, 5 सफाई कर्मचारी, 2 लिपिक यांचा समावेश आहे. जबाब नोंदवण्यात आलेल्या शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या चौकशीतून तीन जणांचा निष्काळजीपणा समोर येत असल्याची सूत्रांची माहिती आहे. यात शाळेच्या मुख्यध्यापिका आणि दोन ट्रस्टींची नावे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना प्रथम लिपीक यांना समजली होती. लिपिकांनी याबाबत मुख्यध्यापिकांना होते. मात्र घटना कळूनसुद्धा पुढे याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली नसल्याचे तपासात समोर आले आहे.
बदलापूर अत्याचाराचे नेमके प्रकरण काय आहे?
बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. सकाळी चालू झालेले हे आंदोलन संध्याकाळापर्यंत चालले होते. या प्रकरणातील आरोपील आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
