Mumbai Railway Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक; ठाणे, दिवादरम्यान ब्लॉक
Mumbai Railway Mega Block : मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक,
बातमी मुंबईकर प्रवाशांसाठी महत्त्वाची... उद्या रविवार असल्यानं मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवादरम्यान तर हार्बरमार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या धावणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळ लोकल सुरू राहणार आहेत. तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान रात्रकालीन ब्लॉक असल्यानं रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही. दरम्यान ब्लॉकवेळेत रेल्वे रुळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते.


















