BJP Candidate List: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 71 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कोणाकोणाला संधी?
Bihar Vidhansabha Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीची नुकतीच घोषणा झाली होती. येत्या 14 नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

Bihar Vidhansabha Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी भाजपकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत (BJP Candidate List) 71 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी (Samrat Choudhary) यांना तारापूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बिहारमध्ये विधानसभेच्या (Bihar Election 2025) 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 6 नोव्हेंबर रोजी, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 14 नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. बिहारमध्ये एकूण 7 कोटी 42 लाख मतदार आहेत. त्यापैकी 3 कोटी 92 लाख पुरुष आणि 3 कोटी 50 लाख महिला मतदार आहेत. 14 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करतील. प्रत्येक मतदान केंद्रावर 1,200 मतदार असतील.
भारतीय जनता पार्टी की केंद्रीय चुनाव समिति द्वारा बिहार विधानसभा चुनाव-2025 के लिए चयनित सभी प्रत्याशियों को हार्दिक बधाई एवं विजयश्री की अग्रिम शुभकामनाएं।#आएगी_NDA pic.twitter.com/vENiqKpx1w
— BJP Bihar (@BJP4Bihar) October 14, 2025
BJP News: भाजपप्रणित NDA जागावाटपाचा फॉर्म्युला
बिहार विधानसभेसाठी भाजपप्रणित NDA चा जागावाटपाचा फॉर्म्युला आधीच जाहीर झाला आहे. भाजप (BJP) आणि नितीश कुमारांचा जनता दल युनायटेड (JDU) प्रत्येकी 101 जागा लढणार आहे. तर चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (LJP-Ram Vilas) 29 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तानी अवाम मोर्चाला (HAM) आणि राष्ट्रीय लोक मोर्चाला (RALOMO) प्रत्येकी 6 जागा मिळाल्या आहेत.
Bihar Polls 2025: पहिल्या यादीतील भाजप उमेदवारांची नावे
बिहार विधानसभा निवडणूक 2025
पहिली यादी
बेतिया – सौ. रेनू देवी
रक्सौल – श्री प्रमोद कुमार सिन्हा
पिपरा – श्री श्यामबाबू प्रसाद यादव
मधुबन – श्री राणा रंधीर सिंह
मोतिहारी – श्री प्रमोद कुमार
ढाका – श्री पवन जायसवाल
रीगा – श्री बैद्यनाथ प्रसाद
बथनाहा (अनुसूचित जाती) – श्री अनिल कुमार राम
परीहार – सौ. गायत्री देवी
सीतामढी – श्री सुनील कुमार पिंटू
बेनीपट्टी – श्री विनोद नारायण झा
खजौली – श्री अरुण शंकर प्रसाद
बिस्फी – श्री हरीभूषण ठाकुर बचौल
राजनगर (अनुसूचित जाती) – श्री सुजीत पासवान
झंझारपूर – श्री नितीश मिश्रा
छतापूर – श्री नीरज कुमार सिंह बबलू
नरपतगंज – सौ. देवांती यादव
फोर्बेसगंज – श्री विद्यसागर केशरी
सिक्टी – श्री विजय कुमार मंडल
किशनगंज – सौ. स्वीटी सिंह
बनमंखी (अनुसूचित जाती) – श्री कृष्ण कुमार ऋषी
पूर्णिया – श्री विजय कुमार खे़मका
कटिहार – श्री तारकिशोर प्रसाद
प्राणपूर – सौ. निशा सिंह
कोरहा (अनुसूचित जाती) – सौ. कविता देवी
सहरसा – श्री आलोक रंजन झा
गौरा बौराम – श्री सुजीत कुमार सिंह
दरभंगा – श्री संजय सरावगी
केवटी – श्री मुरारी मोहन झा
जाले – श्री जिबेश कुमार मिश्रा
औराई – सौ. रमा निषाद
कुरहनी – श्री केदार प्रसाद गुप्ता
बरुराज – श्री अरुण कुमार सिंह
साहेबगंज – श्री राजू कुमार सिंह
बैkungthpur – श्री मिथिलेश तिवारी
सिवान – श्री मंगळ पांडे
दरौंधा – श्री कर्णजीत सिंह
गोरियाकोठी – श्री देवेशकांत सिंह
तरैया – श्री जनक सिंह
अमनौर – श्री कृष्ण कुमार मंटू
हाजीपूर – श्री अवधेश सिंह
लालगंज – श्री संजय कुमार सिंह
पटेपुर (अनुसूचित जाती) – श्री लखेंद्र कुमार रौशन
मुईद्दीननगर – श्री राजेश कुमार सिंह
बछवारा – श्री सुरेंद्र मेहता
तेघरा – श्री रैनीश कुमार
बेगूसराय – श्री कुंदन कुमार
भागलपूर – श्री रोहित पांडे
बांका – श्री राम नारायण मंडल
कटोरिया (अनुसूचित जमाती) – श्री पूरन लाल टुडू
तारापुर – श्री सम्राट चौधरी
मुंगेर – श्री कुमार प्रणय
लखीसराय – श्री विजय कुमार सिन्हा
बिहार शरीफ – डॉ. सुनील कुमार
दीघा – श्री संजीव चौरेसिया
बँकीपूर – श्री नितीन नबीन
कुंभार – श्री संजय गुप्ता
पटना साहिब – श्री रत्नेश कुशवाहा
दानापूर – श्री रामकृपाल यादव
बिक्रम – श्री सिद्धार्थ सौरव
बरहारा – श्री राघवेन्द्र प्रताप सिंह
आरा – श्री संजय सिंह “टायगर”
तरारी – श्री विशाल प्रशांत
अरवल – श्री मनोज शर्मा
औरंगाबाद – श्री त्रिविक्रम सिंह
गुरुआ – श्री उपेन्द्र डांगी
BJP seat sharing: जागावाटपाचा तपशील (Seat Distribution Details)
भाजप (BJP) – 101 जागा
जदयू (JDU) – 101 जागा
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (LJP-Ram Vilas) – 29 जागा
राष्ट्रीय लोक मोर्चा (RALOMO) – 6 जागा
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM) – 6 जागा
Bihar Vidhansabha Seats Detail : बिहारचे पक्षीय बलाबल 2020
एकूण सदस्यसंख्या (Total Seats) – 243
राष्ट्रीय जनता दल (RJD) – 79
भारतीय जनता पक्ष (BJP) – 78
जनता दल (युनायटेड) – JD(U) – 45
काँग्रेस (Congress) – 19
CPI (Marxist–Leninist) Liberation – 12
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (HAM-Secular) – 4
CPI – 2
CPI (M) – 2
AIMIM – 1
अपक्ष आमदार (Independent MLA) – 1
आणखी वाचा
बिहारमध्ये NDA चे जागावाटप ठरलं, भाजप आणि नितीश कुमार समसमान जागा लढवणार, कुणाला किती जागा?
























