(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai PF कार्यालयात तब्बल 21 कोटींचा घोटाळा? बोगस खात्यांमध्ये वळवली 21 कोटींची रक्कम? : ABP Majha
मुंबई : कोविड साथीच्या काळात लोकांना मदत व्हावी या हेतूनं कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO News) नियमांमध्ये थोडी शिथिलता आणण्यात आली. याचाच गैरफायदा घेत मुंबईतील कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं अंतर्गत लेखापरीक्षणात उघडकीस आलं आहे.
मुंबईतील कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील कर्मचाऱ्याने तब्बल 21 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचं अंतर्गत इंटरनल ऑडिटमध्ये उघडकीस आलं आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अर्थात ईपीएफओ ही जगातील सर्वांत मोठ्या सामाजिक सुरक्षा संघटनांपैकी एक आहे, मार्च 2020 ते जून 2021 दरम्यान सगळ्या देशाचं लक्ष कोरोनाच्या साथीकडे आणि लॉकडाऊनवर होतं, त्याच काळात या घोटाळ्याचा मास्टरमाईंड कांदिवली इथल्या पीएफ कार्यालयातील 37 वर्षीय लिपिक चंदन कुमार सिन्हा यानं ही अफरातफर केली.