MUMBAI : Nair Hospital ला 100 वर्षे पूर्ण, मुख्यमंत्र्यांकडून रुग्णालयाला 100 कोटींचा निधी
मुंबई : शहरातील नायर रुग्णलयाला (Nair Hospital) आज शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित नायर रुग्णालयाचा शतक महोत्सवी कार्यक्रम पार पडला. मात्र, या कार्यक्रमात व्यासपीठावर सोशल डिस्टिंनसिंगचा (Social Distancing) विसर पडल्याचे दिसून आले. मंत्र्यासह प्रशासनातील अधिकारी, महापौर मिळून 20 जण एकाच वेळी स्टेजवर होते. त्यामुळे लोकांना वारंवार कोरोना नियम पाळण्यासाठी आवाहन करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिगचा फज्जा उडालेला पहायला मिळाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
विचार करतोय की मी काय बोलावे.. मी फक्त कौतुक, शुभेच्छा देऊ शकतो, अभिनंदन करू शकतो. या संस्थेचं सगळं काम पाहिलं आहे. हा प्रवास थक्क करणारा होता. जिद्द असली तर काय होऊ शकते? याच उदाहरण ही संस्था आहे, असं स्तुती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. या व्यासपीठावर आमचीच गर्दी जास्त म्हणजे राजकारणी मंडळींची आहे, डॉक्टरांची कमी आहे. मंदिर बंद आहे मग देव कुठे आहे तर देव प्रार्थना स्थळात न राहता डॉक्टरांच्या रुपात आहेत. मुंबई मॉडेलचं मुख्यमंत्री म्हणून माझं कौतुक होतंय. पण, याचे खरे मानकरी तुम्ही डॉक्टर आहात. मुंबई महापालिका आयुक्त सुद्धा जॉईन झाल्यावरच धारावीत गेले होते. धारावी आपण संकटातून बाहेर काढली.