Mumbai : मुंबईच्या चारकोपमध्ये लिफ्टमध्ये अडकून वृद्ध महिलेचा मृत्यू
मुंबईतील चारकोपमधील हायलँड ब्रिज या इमारतीत एक ६२ वर्षीय वृद्ध महिला लिफ्टमध्ये अडकून पडली... चौथ्या मजल्यावरुन खाली असताना ही लिफ्ट तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या मधे बंद पडली... यामुळे घाबरून महिलेने आपल्या मुलाला आवाज दिला असता मुलगा पळत पळत आला आणि त्याने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्याला विजेचा शॉक लागल्यामुळे त्याने त्वरित पळत जाऊन विद्युत पुरवठा बंद केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकाला सोबत घेऊन लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता लिफ्ट अति वेगाने तळमजल्यावर जाऊन आदळली. लिफ्ट आदळल्यामुळे तळ भागाला दोन मोठे होल पडले. या दुर्घटनेत त्या वृद्ध महिलेला गंभीर दुखापत झाली. यानंतर जखमी अवस्थेत महिलेला सोसायटीतील रहिवाशांनी एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्या महिलेला मृत घोषित केले. चारकोप पोलीस गुन्हा दाखल करून या घटनेच्या संदर्भात अधिक तपास करत आहे,






















