(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या 'नंदोलिया' केमिकल कंपनीत भीषण स्फोट; दोघांचा मृत्यू
पालघर : बोईसरच्या तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या 'नंदोलिया' केमिकल कंपनीत भीषण स्फोट झाला. स्फोटामुळं तब्बल 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. स्फोटात दोन कामगाराचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. या स्फोटामुळे सालवड, बोईसर, तारापूरसह किनारपट्टीच्या सर्व गावांमध्ये मोठा कंप जाणवला. कंपनीत एकूण 20 कर्मचारी होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे.
डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल ह्या रासायनिक उत्पादनाचे काम चालू असताना मिश्रणामध्ये पाणी जास्त झाले. त्यामुळे डाय क्लोरो डिस्टीलेशन चालू असताना रिॲक्टरचा दाब वाढून हा स्फोट झाल्याची माहिती कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने पोलिसांना दिली आहे. डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल ह्या रासायनिक उत्पादनाचे काम चालू असताना मिश्रणामध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डिस्टीलेशन चालू असताना रिॲक्टरचा दाब वाढून हा स्फोट झाल्याची माहिती कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने पोलिसांना दिली आहे.