Maharashtra Monsoon | वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार, मुंबईत आज, उद्या पावसाचा अंदाज
Maharashtra Monsoon | वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होणार, मुंबईत आज, उद्या पावसाचा अंदाज
येत्या चार आठवड्यांत देशात नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढून वेळेपूर्वीच मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये नैऋत्य मोसमी वारे दाखल होतात आणि त्यानंतर ते हळूहळू देशाच्या इतर भागांमध्ये पसरतात. यंदा केरळमध्ये वेळेपूर्वी मोसमी वारे दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाने येत्या चार आठवड्यातील पावसाचे विस्तारित पूर्वानुमानानुसार पहिला आठवड्यात दक्षिण भारत, महाराष्ट्र, ओडिशा व ईशान्य भारतातील अनेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसऱ्या आठवड्यात पश्चिम किनाऱ्यावर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दक्षिण भारत, महाराष्ट्र, पूर्व भारतातील अनेक भाग, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तिसऱ्या आठवड्यात कर्नाटक, ईशान्य किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वायव्य भारत, तामिळनाडू वगळता देशातील बहुतेक भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. चौथ्या आठवड्यात पूर्व भारत, मध्य भारत, पूर्व राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र आणि कर्नाटक, केरळच्या किनारी प्रदेशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.चार आठवड्यात मोसमी पावसाचा प्रवास वेगात





















