(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jijamata Udya : जिजामाता उद्यानाबाबत सरकारच्या 'त्या' प्रस्तावाला पर्यावरणवाद्यांचा कडाडून विरोध
मुंबईत भायखळ्याच्या जिजामाता उद्यानाला लागून असलेल्या एक हजार 375 चौरस मीटरच्या भूखंडासाठी उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचं आरक्षण हटवून त्याचं निवासी क्षेत्रामध्ये रूपांतर करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला पर्यावरणवाद्यांकडून विरोध होत आहे. जिजामाता उद्यानालगत असलेल्या भूखंडाच्या आरक्षणात बदल करण्याबद्दल बीएमसीकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत. मुंबईत वाढत चाललेले प्रदूषण लक्षात घेऊन अधिकाधिक मोकळ्या जागा शहरात राहाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. पण तरीही जिजामाता उद्यानालगत असलेल्या मोकळ्या जागेवरील आरक्षण हटवून त्याचं निवासीक्षेत्रात रूपांतर करणं चुकीचं असल्याचं पर्यावरवाद्यांचं म्हणणं आहे. राज्याच्या नगरविकास विभागानं 16 नोव्हेंबर 2022 रोजी पत्रक काढून उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचं आरक्षण हटवून, त्या ठिकाणी निवासी क्षेत्र रूपांतरित करण्याचा प्रस्ताव आणला आहे.