Dhirendra Shastri Mumbai : धीरेंद्र शास्त्रींचा मीरा रोडमध्ये कार्यक्रम, अंनिस-काँग्रेसनं केला विरोध
आता बातमी आहे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या बागेश्वरधाम सरकार उर्फ धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यासंदर्भातली.. शास्त्री आज मुंबई दौऱ्यावर आहेत.. आज पहाटे ४ वाजता त्यांचं आगमन झालं. संध्याकाळी ५ वाजता त्यांचा मीरा-भाईंदरमध्ये कार्यक्रम आहे.. शास्त्री यांच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात आलीय. मात्र त्यांच्या आगमनापुर्वीच त्यांना विरोध सुरु झालाय.. अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि काँग्रेसतर्फे शास्त्री यांच्या कार्यक्रमाचा कडाडून विरोध करण्यात आलाय.. काल अंनिसच्या वतिनं तक्रारही दाखल करण्यात आलीय. त्यामुळे धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा मुंबई दौरा यशस्वी होँणार का हे आता पाहाणं औत्सुक्याचं असणार आहे.























