Borivali Accident : खड्ड्यांचे आणखी दोन जीव, पश्चिम द्रुतगती महामार्गावर पती-पत्नीचा अपघाती मृत्यू
मुंबईतल्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर काल झालेल्या अपघातात पती आणि पत्नी अशा दोघांचा मृत्यू झालाय. नाझिर हुसेन शाह आणि छाया खिलारे, असं या मृत दाम्पत्याचं नाव आहे. हे दाम्पत्य मरोळच्या चिमटपाडा परिसरात वास्तव्याला होतं. पश्चिम द्रुतगती महामार्गावर बोरिवली नॅशनल पार्कसमोर असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं आहे. महामार्गावरच्या या खड्ड्यांमुळंच काल दुपारी दीड-दोनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बोरीवलीहून दुचाकीनं दहिसरच्या दिशेनं जात असताना एका खड्ड्यात पडून नाझिर आणि त्याची पत्नी छाया हे रस्त्यावर पडले. दुर्दैवानं त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरनं त्या दोघांनाही चिरडलं. या दुर्घटनेत त्या दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात कस्तुरबा मार्ग पोलिसांनी डंपर चालक सलीम शेखला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या





















