एक्स्प्लोर

E10 Petrol : E20 पेट्रोलमुळे इंजिन खराब अन् मायलेज घटल्याची तक्रार; केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणण्याच्या तयारीत!

E10 Petrol Decision : E20 पेट्रोलमुळे जुन्या गाड्यांच्या इंजिनवर, मायलेजवर परिणाम झाल्याच्या तक्रारींनंतर केंद्र सरकार जुन्या वाहनांसाठी E10 पेट्रोलचा पर्याय पुन्हा उपलब्ध करून देण्यावर विचार करत आहे.

E10 Petrol Reintroduction : देशभरात E20 पेट्रोलचा (20 % इथेलॉल मिश्रित) वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, जुन्या पेट्रोल कार आणि दुचाकींच्या मायलेजमध्ये घट झाल्याच्या तसेच इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारींनंतर केंद्र सरकार आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. या समस्येवर उपाय म्हणून सरकार जुन्या वाहनांसाठी बाजारात पुन्हा E10 पेट्रोल (10 टक्के इथेलॉल मिश्रित) उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे. देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनीही E10 पेट्रोलचा पर्याय देण्याची शिफारस केल्याची माहिती समोर आली आहे.

E10 vs E20 Petrol Differences : E10 पेट्रोलचा पर्याय पुन्हा आणण्याची गरज का भासली?

भारतात सध्या कोट्यवधी जुन्या कार आणि बाईक्स रस्त्यावर धावत आहेत. या वाहनांचे उत्पादन झाले तेव्हा त्यांना E10 पेट्रोल (10% इथेनॉल) लक्षात ठेवून डिझाइन करण्यात आले होते. अनेक कंपन्यांच्या यूझर मॅन्युअलमध्ये (उदा. ह्युंदाईच्या जुन्या मॉडेल्समध्ये) 10 टक्के पेक्षा जास्त इथेनॉल असलेले इंधन न वापरण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली होती. त्यामुळे E20 इंधनामुळे वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

E20 Engine Failure Myth vs Reality : सरकारचे स्पष्टीकरण आणि मारुती सुझुकीचा डेटा

सरकारच्या दाव्यानुसार, E20 पेट्रोलबाबत मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मारुती सुझुकीच्या जवळपास 1.5 कोटी जुन्या वाहनांच्या सर्व्हिस डेटाचा हवाला देत सरकारने स्पष्ट केले की, E20 मुळे मोठ्या प्रमाणावर इंजिन फेल्युअरच्या (Engine Failure) समस्या आलेल्या नाहीत.

तथापि, E20 मुळे जुन्या वाहनांच्या मायलेजमध्ये अल्पशी घट होऊ शकते आणि वाहनातील रबरचे भाग, सील किंवा गॅस्केट यांसारखे सुटे भाग लवकर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे सरकारने मान्य केले आहे.

E10 Petrol Benefits : E10 पेट्रोलमुळे वाहनधारकांना काय फायदा होणार?

सरकारने E10 पेट्रोल पुन्हा बाजारात आणल्यास जुन्या वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

इंधन निवडण्याचे स्वातंत्र्य: वाहनधारकांना त्यांच्या गाडीच्या इंजिनच्या क्षमतेनुसार E10 किंवा E20 इंधन निवडता येईल.

मायलेजमध्ये सुधारणा: इथेनॉलमध्ये साध्या पेट्रोलपेक्षा ऊर्जा कमी असते. E10 मध्ये इथेनॉलचे प्रमाण (10%) कमी असल्याने वाहनांच्या मायलेजवर होणारा प्रतिकूल परिणाम कमी होईल.

इंजिन आणि पार्टसचे रक्षण: 10% पेक्षा कमी एथेनॉल क्षमतेची इंजिन असलेल्या जुन्या गाड्यांच्या इंजिनचे आणि रबरी पार्ट्सचे नुकसान टळेल.

E10 Petrol Distribution Challenges : सरकारसमोरील मोठे आव्हान

E10 आणि E20 ही दोन्ही पेट्रोल बाजारात एकाच वेळी उपलब्ध करून देणे हे सरकार आणि तेल कंपन्यांसाठी मोठे आव्हान असणार आहे. पेट्रोल पंपांवर या दोन्ही प्रकारच्या इंधनांसाठी वेगळे स्टोरेज टँक, वाहतूक व्यवस्था आणि डिस्पेंसिंग पंपांची सोय करावी लागणार आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
सणांपूर्वीच घरघुती बजेट कोलमडलं! 53 टक्के कुटुंब आर्थिक संकटात, सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती समोर 
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
लखपती होण्यास गेला, 1 लाख रुपयांना गंडा बसला! जुन्या नोटांच्या बदल्यात 17 लाख देण्याचं अमिष, शेतकऱ्याची फसवणूक
Advertisement

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget