Delhi Mumbai Expressway चं 375 किमी काम पूर्ण, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून आज आढावा
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज आणि उद्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे च्या कामांचा आढावा घेणार आहेत. हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि गुजरात या चार राज्यांतील हायवेच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे.देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या रस्त्याचे काम 2023 पर्यंत पूर्ण होण्याची आशा आहे. एकूण 1380 किलोमीटरपैकी आतापर्यंत 375 किलोमीटरचे काम पूर्ण झालेलं आहे. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचे काम पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हे अंतर केवळ 12 तासात कापता येणार आहे.हा हायवे दिल्ली-हरयाणा-राजस्थान-गुजरात-मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या सहा राज्यांना कव्हर करतो.या हायवेच्या माध्यमातून दिल्ली-मुंबई कॉरिडॉरमधील आर्थिक विकासाला चालणा देण्यात येणार आहे. या हायवेच्या आजूबाजूला अनेक स्मार्टसिटी उभारता येतील असं गडकरींनी म्हटलंय.
![MNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/d0d1ad555afb8c7251b72d7e31158bc61738206906292718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Maratha Reservation : मोठी बातमी! मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयात नव्यानं सुरू होणार सुनावणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/29/58512d5fcc73321c824f560d66f539f9173815358396590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड लागू, मंदिरात येणाऱ्यांनी अंगभर कपडे घालावे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/933df9ca29f70616a44fd70c1aa6978c173806378056390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anil Parab PC : मी चौकशीला सामोरं जायला तयार; झीशान सिद्दिकींना अनिल परबांचं उत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/28/a0394fb525b3899a251bf04e0412b44c173806099744090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Saif Ali Khan :बदनामीचा सामना करावा लागतोय,सैफ हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेल्या संशयिताचं लग्न मोडलं](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/27/5dbfdfe2e2e38ef67500f394502ce6dd1737983486111718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)