(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour Guest Centre Laxman Hake : मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या सहीसह यावं तर उपोषण सोडेन !
Zero Hour Guest Centre Laxman Hake : मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या सहीसह यावं तर उपोषण सोडेन !
राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय. फक्त राजकीय नाही तर सामाजिक तणावची स्थिती निर्माण झालीय... या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी हे दोन्ही मुद्दे निकालात काढण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज व्यक्त केलीये. मर्यादेबाहेर आंदोलन जाणार नाही, सामाजिक ऐक्याला धोका पोहोचणार नाही याची काळजी घ्या असं शऱद पवारांनी सुनावलंय. केंद्र सरकारला या सगळ्यात निव्वळ बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. केंद्र सरकारने पुढे येऊन या सगळ्यावर तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य यांनी केलंय..
लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून जिथं कणखर नेत्यांच्या डोळ्यात पाणी येतंय.. तिथं त्यांच्या आई-वडियांची काय स्थिती असेल..
हेच जाणून घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातील जुजारपूर गावात पोहोचले.. हेच त्यांचं मुळ गावं... आणि त्यांचे आई-वडिल इथंच असतात.. आम्ही त्यांना गाठलं.. आणि हाकेंच्या उपोषणावर काही प्रश्न विचारलं..
आठ दिवसांच्या उपोषणानंतर लेकाच्या प्रकृतीकडे पाहून त्यांच्या वृद्ध आई-वडिलांना अश्रू अनावर झालेत.. चार दिवसांपासून त्यांच्या घरात चूलही पेटलेली नाही..