(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zero Hour on Pune Accident :दादा विरुद्ध दमानिया, देसाई विरुद्ध धंगेकर, अपघात प्रकरणावरुन नेते भिडले
Zero Hour on Pune Accident :दादा विरुद्ध दमानिया, देसाई विरुद्ध धंगेकर, अपघात प्रकरणावरुन नेते भिडले
झीरो अवरमध्ये पुन्हा एकदा स्वागत.. आता बातमी पुण्यातील रॅश ड्रायव्हिंगसंदर्भातली... गेल्या दहा-बारा दिवसांपासून देशात जितकी चर्चा लोकसभेची चर्चा आहे.. महाराष्ट्रात तितकीच जास्त चर्चा पुणे रॅश ड्रायव्हिंगची आहे.. अल्पवयीन कारचालक... त्याला वाचवण्यासाठी कायद्याला पायदळी तुडवणारे वडील.. त्याच वडीलांना पुरेपूर मदत करणारी प्रशासकीय यंत्रणा आणि आरोग्य व्यवस्थेला विकाणारे दोन डॉक्टर... हे सगळं कमी म्हणून की काय... आता यात राज्य शुल्क उत्पादन खातं.. आणि नार्को टेस्ट.. हे दोन विभाग चर्चेत आलेेत. आपल्याला माहितीय कि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी काल ह्या प्रकरणात अजित पवारांची नार्को टेस्ट करा असे म्हटल्यावर अजित पवारांनी ती चॅलेंज मान्य तर केली, मात्र एक प्रतिआव्हान हि दिलं ... टेस्टमध्ये निर्दोष आढळल्यास दमानियांनी संन्यास घ्यावा असं प्रतिआव्हान अजित पवार यांनी दिलंय.. आता अजित पवारांनी दिलेले हे प्रतिआव्हान अंजली दमानियांनी स्वीकारलंय.