Zero Hour : धूळ, वाहतूक कोंडीमुळे अकोलेकर वैतागले, महापालिकेला कसलीच घाई नाही?
Zero Hour : धूळ, वाहतूक कोंडीमुळे अकोलेकर वैतागले, महापालिकेला कसलीच घाई नाही?
उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिकमधून जाऊयात विदर्भातल्या अकोल्यात. तिथं एका महत्त्वाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे अकोलेकर वैतागले आहेत. कारण जेमतेम एका किलोमीटरच्या कामाला कित्येक महिन्यांचा अवधी लागतोय. पाहूयात महापालिकेचे महामुद्देमधला अकोल्यावरचा खास रिपोर्ट. हा आहे अकोला शहरातील दाबकी रोड. शहरालगतचा ग्रामीण भाग, जुनं अकोला आणि नवीन अकोला या तीन परिसरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. साहजिकच या मार्गावर वाहनांची संख्या प्रचंड असते. म्हणून मग महापालिकेनं हा रस्ता रुंद करण्याचं ठरवलं. १२ मीटरचा रुंदीचा रस्ता १८ मीटरचा करण्यात येतोय. एकूण १ हजार १६० मीटर पट्ट्याचं रुंदीकरण प्रगतिपथावर आहे. त्यासाठी आधी कायद्यानं सर्व घर आणि दुकान मालकांना नोटिशी बजावण्यात आल्या, नंतर भरपाई देऊन जमीन अधिग्रहित करणं सुरू झालं.






















