Who is Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई! 3 वेळा खासदार आता केंद्रात मंत्री;रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
Who is Raksha Khadse : नाथाभाऊंच्या सुनबाई! 4 वेळा खासदार आता केंद्रात मंत्री;रक्षा खडसेंचा राजकीय प्रवास
जळगावच्या राजकारणात नेहमीचा खडसे कुटुंबियांचा दबदबा राहिला आहे. रक्षा खडसे या सलग तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांनी शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे. रक्षा खडसेंना आता केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार आहे. रक्षा खडसे यांचा जन्म 12 मे 1987 रोजी झाला. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांचे लग्न एकनाथ खडसेंचे दिवंगत पुत्र निखिल खडसे यांच्यासोबत झाले होते. निखिल खडसे यांनी आत्महत्या केल्यानंतर रक्षा खडसे यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आहे.






















