Maharashtra Unlock : 25 जिल्ह्यांना दिलासा देण्याचा निर्णय कधी? नवी नियमावली कधी जाहीर करणार?
ब्रेक द चेनची नवीन नियमावली आज रात्री पर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. दोन दिवसापूर्वी टास्क फोर्सच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार आरोग्य विभागाने ही फाईल मुख्यमंत्री यांच्याकडे सहीसाठी पाठवली होती. मुख्यमंत्री यावर निर्णय घेऊन आज निर्णय घोषित करण्याची शक्यता आहे. यामध्ये 11 जिल्हे सोडले तर उर्वरित 25 जिल्ह्यांमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
यासोबत मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये काही प्रमाणात नियम शिथिल केले जाणार आहेत. मात्र पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर,अहमदनगर, बीड, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे नवीन नियमावली कशी असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.





















