Nitesh Rane धर्मांतरांवरुन संतापले, Ulhasnagar पोलिसांना विचारला जाब : ABP Majha
उल्हासनगरमध्ये एका धर्माच्या २६ वर्षीय तरुणाने दुसऱ्या धर्मातील एका २४ वर्षांच्या तरुणीला पळवून नेल्याची घटना घडली होती. एका दुकानात एकत्र काम करत असताना या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र घरच्यांचा संभाव्य विरोध लक्षात घेत हे दोघे पळून गेले. याप्रकरणी ८ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सदर तरुणी हरवल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दाखल केली होती. ही तरुणी या तरुणासोबत आधी केरळ आणि तिथून पश्चिम बंगालला गेली. याबाबतची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी थेट पश्चिम बंगाल गाठत वीरभूम जिल्ह्यातील नानूर इथे जाऊन या तरुण आणि तरुणीची भेट घेतली. यावेळी आम्ही लग्न करणार असून आम्हाला परत येण्याची इच्छा नसल्याचं स्टेटमेंट या मुलीने पोलिसांना दिलं. ही मुलगी सज्ञान असल्यामुळे पोलीस तिच्या इच्छेविरुद्ध तिला परत आणू शकले नाहीत. याबाबत उल्हासनगरातील भाजप आणि बजरंग दलाच्या काही कार्यकर्त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली, तसंच कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना आरोपीसारखी वागणूक देत मारहाण करत त्यांच्यावरच सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्याची धमकी त्यांना दिली, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला. या प्रकारानंतर नितेश राणे यांनी आज उल्हासनगर पोलीस ठाण्यात येत सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश फुलपगारे यांची भेट घेतली. या भेटीत नितेश राणे यांनी पोलिसांवर चांगलीच आगपाखड केली. तक्रार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल करत नितेश राणे हे अधिकाऱ्यांवर चांगलेच भडकल्याचं पाहायला मिळालं.
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)