(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulhas Bapat on Maharashtra Political Crisis :पक्षचिन्ह ते बंडखोर आमदार, शिंदे ठाकरेंचा सुप्रीम फैसला
Ulhas Bapat on Maharashtra Political Crisis :पक्षचिन्ह ते बंडखोर आमदार, शिंदे ठाकरेंचा सुप्रीम फैसला
शिवसेना कुणाची?, ठाकरेंची की शिंदेंची?, या संघर्षाची सुनावणीही आज निवडणूक आयोगासमोर होणारेय. शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी कागदपत्र सादर केलीयत. त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत महत्त्वाची सुनावणी आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोग घेणारेय. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी, 2 लाख 82 हजार 975 संघटनात्मक प्रतिनिधी आणि 19 लाख 21 हजार 815 प्राथमिक सदस्य असल्याचा शपथपत्रांद्वारे दावा केलाय. तर शिंदे गटानं 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2 हजार 046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4 लाख 48 हजार 318 प्राथमिक सदस्य असल्याची शपथपत्रं आयोगाकडे सादर केली आहेत.