Ujani Dam : परतीच्या पावसानं साथ दिल्यास उजणी धरण 100% भरण्याची शक्यता
Ujani Dam : परतीच्या पावसानं साथ दिल्यास उजणी धरण 100% भरण्याची शक्यता संपूर्ण पावसाळा हंगामात साखरपट्ट्याकडे पाठ फिरविलेल्या वरुणराजाने परतीच्या प्रवासात जोरदार बरसात केल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळाला आहे.... आता उसाच्या लागवडीला सुरुवात होईलच शिवाय उभ्या उसालाही जीवदान मिळणार आहे . सध्या उजनी धरणात सकाळी ४२ टक्के पाणीसाठा असून उद्यापर्यंत धरण ५० टक्क्यांची पातळी ओलांडणार आहे . यामुळे बळीराजा सध्या खुशीत असून शेतातील उभ्या पिकाला या पाण्याने नवसंजीवनी मिळाली आहे . आज सकाळी उजनी धरणात ४० हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत असून यामुळे उद्या धरण ५० टक्क्यांची पातळी ओलांडणार आहे . . उजनीतील पाण्यामुळे आता पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून शेतीलाही रब्बीसाठी एक पाणी पाळी देणे शक्य होणार आहे . तसंच जर परतीच्या पावसानं साथ दिली तर उजनी धरण १०० टक्के भरणार आहे.