(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग
Uddhav Thackeray Gat Incoming : भाजप अजित पवारांना मोठा धक्का, ठाकरे गटात जोरदार इनकमिंग
एकाबाजूला शहाजीबापू यांचे मित्र महायुती सोडून मशाल हाती घेत आहेत तर दुसऱ्या बाजूला बापू यंदा निवडणूक रिंगणातून माघार घेणार अशी टीका शरद पवार गटाचे दुसरे मित्र करीत असताना बापूनी सांगोल्यात युवक मेळावा घेत विशाल शक्ती प्रदर्शन करून विरोधकांवर तुफानी टोलेबाजी केली . आपल्या खुमासदार भाषणात संजय राऊत , उद्धव ठाकरे यांचेसह शेकापच्या नेत्यांवर बापूनी तोफ डागली . गुरुवारी शहाजीबापू यांची सांगोला शहराच्या प्रवेशद्वार पासून युवकांकडून भव्य अशी रॅली काढण्यात आली होती. ठिकठिकाणी जेसीबी ने फुलांची उधळण करीत आणि हलग्यांच्या कडकडाटात बापुंना वाजत गाजत युवक मेळाव्याच्या ठिकाणी आणण्यात आले . यावेळी एवढी प्रचंड गर्दी होती कि शहरात ठिकठिकाणी बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती . यानंतर मेळाव्यात बापूनी आपल्या नेहमीच्या शैलीत फटकेबाजी करण्यास सुरुवात केल्यावर युवकांचा तुफानी प्रतिसाद पाहता बापूंची आजही तरुणात मोठी क्रेझ असल्याचे दिसत होते . लाडकी बहीण योजना आणल्यावर विरोधक कशा रीतीने रोज वेगवेगळ्या शब्दात टीका करीत होते याचा समाचार घेताना लागा खऱ्या बापाचे असल्यासारखे एका शब्दावर ठाम राहा कि असा टोला लगावला . संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टोलेबाजी करताना रोज सकाळी दांडकी गोळा करून बडबडत याने महाराष्ट्राला भांबावून सोडण्याचे काम केले असा टोला लगावला . या शहाजी पाटीलने त्याला खासदार व्हायला मत दिले पण तो इतकी वर्षे खासदार आहे पण एकदा तरी एखादे खासदार निधीचे काम केल्याचे कधी सांगतो का असा टोला लगावला . आता आपल्याबद्दल बोलत नसतो असे सांगताना एकदाच त्याला असे उत्तर दिले आहे कि त्याची बडबड कायमची बंद केल्याचे बापूनी सांगितले .