एक्स्प्लोर

Uddhav Thackeray on Devendra Fadnavis:उद्धव ठाकरे यांचा शब्द अन् शब्द, देवेंद्र फडणवीसांना इशारा

मुंबई: आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस कशाप्रकारे डाव खेळत होते, हे मला अनिल देशमुख यांनी सांगितले. आता एक तर तू राहशील नाहीतर मी राहील, अशा शब्दांत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. ते बुधवारी मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याविरुद्ध थेट 'आर या पारची' भूमिका घेतल्याने आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. 

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोठे नेते आपल्याला भेटून गेले आहेत. अनेकजण म्हणाले की, उद्धवजी आपने देश को दिशा दिखाई है. मी म्हणालो, जोपर्यंत आपण सरळ होतो, तोपर्यंत सरळ असतो. पण एकदा वाकड्यात घुसलो की आपण वाकडं करतो. भाजप म्हणजे चोर कंपनी आहे, ही राजकारणातील षंढ माणसं आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 

लोकसभा निवडणुकीत आपण असे लढलो की, मोदींनाही घाम फुटला. मोदींची भाषण ऐकताना आता कीव येते. मी कधी नगरसेवक झालो नव्हतो, थेट मुख्यमंत्री झालो. जे जे शक्य होतं, ते सगळं मी केले. हे आपल्यासाठी शेवटचं आव्हान आहे. त्यानंतर आपल्याला आव्हान देणार कोणी राहणार नाही. यांनी आपला पक्ष आणि कुटुंब फोडला. आता हे आपल्याला आव्हान द्यायला उभे आहेत. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा होता. आपल्या हक्काच्या मुंबईत आपल्याला असे वागवले जात आहे. हे सगळं दोन व्यापारी करत आहेत. त्यांची वृत्ती आपल्याला मुळासकट उपटून टाकायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले. 

मी सगळं सहन करुन उभा राहिलोय, आता एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन: उद्धव ठाकरे

आताही ज्या कोणाला जायचं असेल त्यांनी खुशाल जा, माजी नगरसेवकांना जायचं असेल तर जा. मी माझा शिवसैनिकांना घेऊन लढेन. अरे तर मी या तडफेने उतरलोय की, एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी राहीन. गीतेमध्ये हेच सांगितलं आहे की, ज्यावेळी अर्जुनाने पाहिलं की, माझे सगळे नातेवाईक माझ्यासमोर आहेत. यातना होणं स्वाभाविक आहे, मलाही होत नसतील का? कालपर्यंत माझ्यासोबत असणारे लोक आज माझ्या घरावर चालून येत आहेत. अनिल देशमुखांनी सांगितलं की, कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते. हे सगळं सहन करुन मी हिंमतीने उभा राहिलेलो आहे. एकतर तू तरी राहशील नाहीतर मी तरी राहीन. अजूनही माझ्याकडे अधिकृत पक्ष, चिन्ह आणि पैसा नाही. पण मी केवळ तुमच्या ताकदीवर या सगळ्यांना आव्हान देत आहे. मी म्हणजे मी नाही, तुम्ही सगळे आहात. दिल्लीच्या छातीत उद्धव ठाकरेची नाही तुमची धडकी भरली आहे. पण आगामी दिवसांमध्ये मशाल चिन्हाचा प्रचार करा. लोकसभा निवडणुकीत या चोरांनी बाळासाहेबांचा फोटो लावला आणि धनुष्यबाण चिन्हाला मत देण्याचे आव्हान केले. त्यामुळे लोकांमध्ये अजूनही संभ्रम आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  

कर्णही अशीच भाषा बोलायचा, उद्धव ठाकरे लोकशाहीच्या लढाईत कौरवांच्या बाजूने: सुधीर मुनगंटीवार

महाभारतात कर्णाने अर्जुनाला असाच इशारा दिला होता, इथेही असंच काहीसं घडतंय, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. कर्ण हा पांडवांचा भाऊ होता. इतिहासाची पुनरावृत्ती होते. बाळासाहेब ठाकरे कधीच काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नव्हते. काँग्रेससोबत ज्या दिवशी जावं लागेल, त्यादिवशी मी माझं दुकान बंद करेन, असे त्यांनी म्हटले होते. पण दुर्दैवाने जी कर्णाची भूमिका दुर्योधनाच्या आणि कौरवाच्या बाजूने जाण्याची होती, ती भूमिका उद्धवजींनी या लोकशाहीच्या युद्धात घेतली आहे. कर्ण ज्याप्रकारे अर्जुनाला उद्देशून बोलायचा, एकतर तू राहशील किंवा मी राहीन, तीच भाषा, तोच भाव, तीच कथा, तोच प्रसंग हे आपण आता लोकशाहीच्या युद्धात पाहतोय. कोणीही कोणाला धडा शिकवण्याची भाषा कधी करु नये. रावणाने भाषा केली, कंसाने भाषा केली, जेव्हा जेव्हा अशी भाषा केली जाते, आपण शकुनीसारख्या लोकांच्या नादी लागतो, तेव्हा आपण किती शक्तिशाली असलो तरी अपयशच आपल्या वाट्याला येते, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.  

महाराष्ट्र व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane : बाळ माने ओरीजनल भाजपचाच; निवडणुक आल्या तळ्यात-मळ्यात, 5 वर्षाची तडजोड ते करतात; नारायण राणेंची बोचरी टीका, विनायक राऊतांनाही सुनावलं!
बाळ माने ओरीजनल भाजपचाच; निवडणुक आल्या तळ्यात-मळ्यात, 5 वर्षाची तडजोड ते करतात; नारायण राणेंची बोचरी टीका, विनायक राऊतांनाही सुनावलं!
Amol Kolhe Shared Me Savitribai Jyotirao Phule Emotional Video: 'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' मालिका बंद होणार? चर्चांना उधाण; डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
'मी सावित्रीबाई जोतिराव फुले' मालिका बंद होणार? चर्चांना उधाण; डॉ. अमोल कोल्हे यांचा सेटवरचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Maharashtra Live News Updates: पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांचा राजीनामा, पक्षातील अंतर्गत वादामुळे राजीनामा
Imtiaz Jaleel: मोठी बातमी: माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर? निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता
माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर? निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता

व्हिडीओ

Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More:
"घोडेबाजार नाही, ही 100% सेटलमेंट!", वसंत मोरेंचा शरद पवार गटावर घणाघात, म्हणाले, 'पुण्यात पाठीत खंजीर खुपसला, मविआतून बाहेर पडा; मी वरिष्ठांना सांगितलंय!'
Bal Mane : विनायक राऊत डोमकावळा, कोकणात शिवसेनेची वाट लावली, शिंदेंचे भाट म्हणून काम करतात, बाळ मानेंचा हल्लाबोल
विनायक राऊतांनी कोकणात शिंदेसेनेची सुपारी घेतली, ते शिंदेसेनेचे भाट, बाळ मानेंचा राणेंच्या घरासमोरुन पलटवार
Gold Silver Rate : आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे, शेअर बाजारात तेजी, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण
गुड न्यूज, सोनं 1896 रुपयांनी स्वस्त, चांदीच्या दरात 6000 रुपयांची घसरण, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
Captain Bharat Bhardwaj Viral Video : दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
दीक्षांत सोहळ्यात गुडघ्यावर बसून प्रपोज करणं तरुणाला महागात पडण्याची शक्यता; भारतीय लष्कर कारवाई करण्याच्या तयारीत
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
मंत्री गिरीश महाजनांना नदी स्वच्छता मोहिमेदरम्यान सापडली 'पिस्तूल', नाशिकमध्ये खळबळ; PHOTO
Repo Rate RBI MPC Meeting: रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, Home Loan महागणार की स्वस्त होणार?  
 रेपो रेट कायम राहणार की वाढणार? गव्हर्नर संजय मल्होत्रा घोषणा करणार, गृहकर्जदारांचं लक्ष लागलं
Tukaram Munde News: जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ?; लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी
Aamir Khan Confirm His Wedding With Gauri Spratt: 'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
'होय, खरंय... आम्ही लग्न करतोय!'; आमिर खाननं कन्फर्म केली तिसऱ्या लग्नाची गूड न्यूज, तारीखही सांगून टाकली
Embed widget