एक्स्प्लोर
Uddhav Thackeray Beed : 'सरकार मतचोरीचं, निवडून दिलेलं नाही', ठाकरेंचा हल्लाबोल
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. त्यांनी सरकारवर 'मतचोरी' करून सत्तेत आल्याचा गंभीर आरोप केला. 'तुम्हाला असं वाटतंय हे तुम्ही निवडून दिलेलं सरकार असेल, आनंदात रहा... पण जर सरकार मतचोरी करुन आलेलं असेल तर...', असे थेट विधान उद्धव ठाकरे यांनी केले. उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य असल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना 'अनाथ मंत्री' संबोधले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. जूनमध्ये कर्जमाफी करताना बँकांचा फायदा न होऊ देता शेतकऱ्यांना थेट लाभ कसा देणार, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. वीजबिल माफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पॅकेजवरूनही त्यांनी सरकारवर टीका केली. पैठणच्या आमदाराने बाहेरून मतदार आणून जिंकल्याची कबुली दिल्याचा दावाही त्यांनी केला.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















