Uday Samant vs Vaibhav Naik : ॲाडिट करणं म्हणजे ठाकरेंना इशारा नाही, सामंत-नाईकांमध्ये खडाजंगी
Uday Samant vs Vaibhav Naik : ॲाडिट करणं म्हणजे ठाकरेंना इशारा नाही, सामंत-नाईकांमध्ये खडाजंगी
Maharashtra Politics: मुंबई महापालिकेतील (Mumbai Municipal Corporation) गेल्या 25 वर्षांच्या आर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यीय समिती गठित करणार असल्याची घोषणा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केली. याच मुद्द्यावरुन उदय सामंत आणि वैभव नाईक (Vaibhav Naik) यांच्यात विधीमंडळ परिसरात खडाजंगी पाहायला मिळाली. दरम्यान, अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना यासंदर्भात मागणी केलेली. त्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात घोषणा केली.
बीएमसीमध्ये एखादी चौकशी झाली की, ठाकरेंच्या विरोधातच होईल, असं म्हणणं चुकीचं आहे, असं उदय सामंत म्हणाले. तर बीएमसी ज्यांच्या अखत्यारित आहे, त्या नगरविकास खात्याचीही चौकशी करा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांनी केली आहे. दरम्यान, नागपुरात विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात भाजप आमदार योगेश सागर यांनी पुरवणी मागणीवर बोलताना यासंदर्भात मागणी केलेली. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या मागील 25 वर्षातील अर्थिक व्यवहारांचं ऑडिट होणार आहे. यासाठी तीन सदस्यांची समिती गठीत करत असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे.